‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्री अडकली लग्नबंधनात! नवरा ‘या’ लोकप्रिय मालिकेत करतोय काम, फोटो आले समोर
रेश्मा शिंदे पाठोपाठ आणखी एका अभिनेत्रीचा पार पडला लग्नसोहळा, नवरा सुद्धा आहे अभिनेता, फोटो व्हायरल
Tula Shikvin Changlach Dhada Fame Virisha Naik Wedding : मराठी कलाविश्वात सध्या लगीनघाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत चंचलाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीने लवकरच लग्न करणार असल्याची आनंदाची बातमी चाहत्यांना दिली होती. यानंतर चंचलाचं लग्न केव्हा होणार याची तिचे चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अखेर आज खऱ्या आयुष्यात या अभिनेत्रीचा विवाहसोहळा थाटामाटात पार पडला आहे. तिच्या लग्नसोहळ्यातील इनसाइड फोटो सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत.
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत चंचलाची भूमिका अभिनेत्री विरीशा नाईक साकारत आहे. वैयक्तिक आयुष्यात अभिनेत्री नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. मेहंदी, हळद पार पडल्यावर आज विरीशा आणि प्रशांत लग्नबंधनात अडकले आहेत. या सोहळ्यातील काही फोटो त्यांच्या मित्रमंडळींनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.