MHT CET 2025: इंजिनीअरिंगची सीईटी १९ ते २७ एप्रिलदरम्यान; सीईटी परीक्षांचे तात्पुरते वेळापत्रक जाहीर, वाचा सविस्तर
MHT CET exam date 2025 Maharashtra: ‘एलएलबी (तीन वर्ष कालावधी)-सीईटी’ २० व २१ मार्च रोजी होणार आहे. ‘एमसीए-सीईटी’ २३ मार्च रोजी. बीएड अभ्यासक्रमासाठीची सीईटी २४ ते २६ मार्च तर बीपीएड अभ्यासक्रमासाठीची प्रवेश पूर्व परीक्षा २७ मार्च रोजी होणार आहे. ‘एम.एचएमसीटी-सीईटी’ २७ मार्च तर बी.एचएमसीटी/एम.एचएमसीटी इंटीग्रेटेड सीईटी २८ मार्च रोजी असणार आहे. बीए-बीएड/बीएस्सी बीएड चार वर्ष इंटीग्रेटेड अभ्यासक्रमासाठीची सीईटी व बीएड-एमएड तीन वर्ष इंटीग्रेटेड अभ्यासक्रमासाठीची सीईटी २८ मार्च रोजी होणार आहे.
मुंबई : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे विविध अभ्यासक्रमांची २०२४-२५ या वर्षांतील प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली नसताना, सीईटी कक्षाने बुधवारी २०२५-२६साठीच्या सीईटी परीक्षांचे तात्पुरते वेळापत्रक जाहीर केले आहे. बीई-बीटेकसाठी १९ ते २७ एप्रिल २०२५ दरम्यान सीईटी होणार आहे. अधिक माहितीसाठी https://www.mahacet.org या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
MHT CET Date 2025, वेळापत्रक : एमबीए/एमएमएस १७, १८, १९ मार्च, एलएलबी ३ वर्षे २०, २१ मार्च, बीएड/बीएड इलेक्ट २४, २५, २६ मार्च, बीए बीएड/बीएससी बीएड २८ मार्च, बी-डिझाइन २९ मार्च, बीबीए/बीसीए/बीबीएम/बीएमएस १, २, ३ एप्रिल, एलएलबी ५ वर्षे ४ एप्रिल, नर्सिंग ७, ८ एप्रिल, सीईटी पीसीबी ग्रुप (वैद्यकीय, कृषी) ९ ते १७ एप्रिल, सीईटी पीसीएम ग्रुप (बीई-बीटेक) १९ ते २७ एप्रिल.
राज्य समाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या (सीईटी सेल) माध्यमातून अभियांत्रिकी, कृषी, फार्मसीसह विविध अभ्यासक्रमांच्या २०२५ मधील संभाव्य तारखा बुधवार २७ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आल्या. एमएचटी-सीईटी (पीसीबी) ग्रुपसाठीची परीक्षा ९ एप्रिल ते १७ एप्रिल तर पीसीएम ग्रुपसाठी १९ ते २७ एप्रिल दरम्यान प्रवेश पूर्व परीक्षा होणार आहे.
‘सीईटी सेल’कडून विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर अभ्यासकांसाठी प्रवेशासाठी सीईटी घेण्यात येते. २०२५-२६ शैक्षणिक वर्षातील प्रवेशासाठीच्या वेगवेगळ्या अभ्यासक्रमाच्या संभाव्य तारखा ‘सीईटी सेल’ने आज जाहीर केल्या आहेत. २०२५ मध्ये घेण्यात येणाऱ्या या १९ परीक्षा १६ मार्च ते २७ एप्रिल दरम्यान घेण्यात येणार आहेत. यात ‘एमएड’, ‘एमपीएड’ची सीईटी १६ मार्च रोजी होणार आहे. व्यवस्थापनशास्त्र अभ्यासक्रम प्रवेशासाठीची ‘एमबीए/एमएमएस-सीईटी’ १७, १८ व १९ मार्च दरम्यान घेण्यात येणार आहे.
‘एलएलबी (तीन वर्ष कालावधी)-सीईटी’ २० व २१ मार्च रोजी होणार आहे. ‘एमसीए-सीईटी’ २३ मार्च रोजी. बीएड अभ्यासक्रमासाठीची सीईटी २४ ते २६ मार्च तर बीपीएड अभ्यासक्रमासाठीची प्रवेश पूर्व परीक्षा २७ मार्च रोजी होणार आहे. ‘एम.एचएमसीटी-सीईटी’ २७ मार्च तर बी.एचएमसीटी/एम.एचएमसीटी इंटीग्रेटेड सीईटी २८ मार्च रोजी असणार आहे. बीए-बीएड/बीएस्सी बीएड चार वर्ष इंटीग्रेटेड अभ्यासक्रमासाठीची सीईटी व बीएड-एमएड तीन वर्ष इंटीग्रेटेड अभ्यासक्रमासाठीची सीईटी २८ मार्च रोजी होणार आहे.