चालू घडामोडीटेक न्यूजतुमचा फायदालाईफस्टाईलवेब स्टोरीव्हायरल

Pharmacy admission 2024-25: फार्मसीच्या प्रवेशप्रक्रियेचा तिढा सुटला, महाविद्यालयीन स्तरावरील प्रवेशफेरी सुरू होणार

d pharmacy admission 2024-25 maharashtra: अखेर दीड महिन्यानंतर प्रवेशप्रक्रियेच्या तिसऱ्या फेरीसह पुढील प्रवेशाचे वेळापत्रक गुरुवारी जाहीर करण्यात आले. सीईटी सेलचे वेळापत्रक आल्यानंतर राज्यभरातील विद्यार्थी, पालकांची प्रतीक्षा संपली. प्रवेशासाठी तिसरी आणि चौथी फेरी महाविद्यालयस्तरावर होणार आहे. प्रवेशप्रक्रिया लांबल्याने प्रथम वर्षातील प्रवेशित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष कोलमडले आहे. फार्मसी अभ्यासक्रमाच्या इतर वर्षातील नोव्हेंबर-डिसेंबर सत्र परीक्षांचे अनेक विद्यापीठाचे वेळापत्रक जाहीर झाले.

रोहन टिल्लू, मुंबई : d pharmacy admission 2024-25 maharashtra : दीड महिन्यापासून थांबलेल्या औषधनिर्माणशास्त्र पदवी (बी. फार्मसी), पदव्युत्तर पदवी (एम. फार्मसी), डॉक्टर ऑफ फार्मसी (फार्म. डी.) अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेचा तिढा सुटला आहे. राज्य समायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) गुरुवारी तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर केले. यासाठी शुक्रवारी रिक्त जागांची यादी जाहीर झाली. आता महाविद्यालयीन स्तरावरील प्रवेशफेरी सुरू होणार आहे.

सीईटी सेलतर्फे विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची प्रवेशप्रक्रिया (D pharmacy 2024 maharashtra registration) राबवण्यात येते. २०२४-२५ शैक्षणिक वर्षात औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांसाठी ७ जुलैपासून प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. ‘फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया’कडून महाविद्यालयांच्या मान्यतेची प्रक्रिया लांबली. त्यामुळे प्रवेशप्रक्रियेला थांबली होती. त्यात प्रवेशाची पहिली फेरी ५ ऑक्टोबरला सुरू झाली. ५ ते १४पर्यंत पहिली फेरी पूर्ण झाली. दुसरी फेरी १६ ते २४पर्यंत घेण्यात आली. त्यानंतर २४ ऑक्टोबरपासून प्रवेशाची प्रक्रिया थांबली. त्यामुळे राज्यभरातील हजारो विद्यार्थी, पालक गोंधळात पडले. सीईटी सेलकडूनही याबाबत योग्य उत्तरे दिली जात नव्हती. त्यामुळे गोंधळ वाढत गेला.

D pharmacy 2024 maharashtra eligibility: अखेर दीड महिन्यानंतर प्रवेशप्रक्रियेच्या तिसऱ्या फेरीसह पुढील प्रवेशाचे वेळापत्रक गुरुवारी जाहीर करण्यात आले. सीईटी सेलचे वेळापत्रक आल्यानंतर राज्यभरातील विद्यार्थी, पालकांची प्रतीक्षा संपली. प्रवेशासाठी तिसरी आणि चौथी फेरी महाविद्यालयस्तरावर होणार आहे. प्रवेशप्रक्रिया लांबल्याने प्रथम वर्षातील प्रवेशित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष कोलमडले आहे. फार्मसी अभ्यासक्रमाच्या इतर वर्षातील नोव्हेंबर-डिसेंबर सत्र परीक्षांचे अनेक विद्यापीठाचे वेळापत्रक जाहीर झाले. परंतु अद्याप प्रथम वर्षाची प्रवेशप्रक्रियाच अपूर्ण आहे. त्यामुळे विद्यापीठांना आता या प्रक्रियेत प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी वेगळे नियोजन करावे लागणार आहे.

असे असेल वेळापत्रक –

प्रक्रियेचा तपशील तारीख
रिक्त जागांची यादी ६ डिसेंबर
कॉलेंजांचे पर्याय देणे ७ ते ९ डिसेंबर
तिसऱ्या फेरीची निवडयादी १२ डिसेंबर
महाविद्यालयांमध्ये प्रत्येक प्रवेश १३ ते १६ डिसेंबर
महाविद्यालय स्तरावर प्रवेश फेरी १८ ते २३ डिसेंबर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button