PHOTO: पुणेकरांचा विषयच हार्ड! उधारी रोखण्यासाठी जुगाड; दुकानात लावली अशी पाटी, लोकं स्वप्नातही मागणार नाही उधार
उधार मागणाऱ्या ग्राहकांच्या जाचाला कंटाळून ही पाटी लावली आहे. या पाटीमुळे पुणेकरांच्या सर्जनशीलतेचं आणि हटके पाट्यांचं पुन्हा एकदा दर्शन झालयं.
Puneri pati: आपला व्यवसाय, धंदा वाढावा, वस्तूंचा खूप खप व्हावा असे कोणत्या दुकानदाराला वाटणार नाही. यासाठी दुकानदार वेगवेगळ्या प्रकारे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी पोस्टर लावतात. परंतू, एका दुकानदाराने उधारी बंद करण्यासाठी अनेक कारण देऊन पाटी लावली आहे. ती वाचून लोकांनीदेखील उधारी मागणे बंद केले आहेत. उधार मागणाऱ्या ग्राहकांच्या जाचाला कंटाळून ही पाटी लावली आहे. या पाटीमुळे पुणेकरांच्या सर्जनशीलतेचं आणि हटके पाट्यांचं पुन्हा एकदा दर्शन झालयं.
दुकानात अशी पाटी लागली आहे. याद्वारे दुकानदाराने उधारीपासून मुक्ती मिळविली आहे. त्याने वैतागून उधारी बंद केली होती. परंतू त्याचे ग्राहक सारखे त्याच्यामागे उधारी मागत होते. यामुळे हा दुकानदार आणखी त्रस्त झाला होता. यामुळे दुकानदाराने उधारी पुन्हा सुरु करण्यासाठी ही पाटी लावली आहे. ही पाटी आता शहरभरात चर्चेचा विषय ठरली आहे. लोकांना उधारी मागणे सुरुच ठेवले होते. प्रत्येकाला नाही नाही सांगून वैतागल्याने शेवटी अशी पाटी लावली आहे.‘पुणे तिथे काय उणे’ असं पुण्याबाबत नेहमी म्हटलं जातं, याचा प्रत्यय आज आला.