Vinod Kambli : विनोद कांबळीने कपिल देव यांची ती ऑफर स्वीकारली, आता सचिनसोबत नातं कसं आहे? सगळंच सांगितलं
Vinod Kambli News In Marathi : सचिन तेंडुलकरचा बालपणीचा मित्र विनोद कांबळी अनेक गंभीर आजारांना तोंड देत आहे. त्याची आर्थिक स्थितीही चांगली नाही. अलीकडेच तो प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या स्मृती कार्यक्रमात दिसला होता.
विनोद कांबळी अलीकडेच सचिनसोबत त्यांच्या बालपणीचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या स्मृतिदिनाच्या कार्यक्रमात दिसला होता. तेव्हापासून त्याच्या प्रकृतीबद्दल बरीच चिंता व्यक्त केली जात आहे. त्यानंतर टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव याने १९८३ च्या विश्वचषक विजेत्या सहकाऱ्यांसह कांबळीला रिहॅबसाठी मदतीची ऑफर दिली.
आता पहिल्यांदाच कांबळीने त्याची तब्येत, सचिनसोबतचे नाते आणि रिहॅबबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. त्याने आपली प्रकृती आणि आर्थिक परिस्थितीही उघड केली.
कांबळीने कपिल देवची ऑफर स्वीकारली
५२ वर्षीय विनोद कांबळी याने नुकतीच विकी लालवाणीच्या यूट्यूब चॅनलवर मुलाखत दिली आहे. यादरम्यान त्याने कपिल देव यची ऑफर स्वीकारली आणि त्याच्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कांबळी म्हणाला, ‘मी पुनर्वसनासाठी तयार आहे. मला जायचे आहे कारण मला कशाचीच भीती वाटत नाही. माझे कुटुंब माझ्यासोबत आहे.’ याचा अर्थ तो १५व्यांदा रिहॅबसाठी तयार आहे.