तुमचा फायदावेब स्टोरी

ट्रायम्फ स्क्रॅम्बलर T4 टेस्टिंग दरम्यान झाली स्पॉट; भारत मोबिलिटी 2025 मध्ये होऊ शकते लाँच

Triumph Scrambler T4 Spotted During Testing: Triumph Scrambler T4 भारतात लाँच होण्यापूर्वी टेस्टिंग दरम्यान स्पॉट झाली आहे. ही बाईक कदाचित भारत मोबिलिटी 2025 मध्ये लाँच

Triumph Scrambler T4 भारतात लाँच होण्यापूर्वी टेस्टिंग दरम्यान स्पॉट झाली आहे. ही बाईक कदाचित भारत मोबिलिटी 2025 मध्ये लाँच होऊ शकते. या बाईकची किंमत 2.4 लाख रुपये असू शकते अशी शक्यता आहे. ह्या स्पॉट झालेल्या बाईकमध्ये कोणती नवीन फीचर्स असतील, तसेच याची रेंज कास असेल? जाणून घेऊ सविस्तर…
(वाचा)- Skoda Kylaq Booking Start: भारतात Skoda Kylaq चे बुकिंग सुरु; सर्व व्हेरिएंट्च्या किमती आल्या समोर

Triumph Scrambler T4 : बाईकमध्ये काय असणार खास?

या बाईकमध्ये इलेक्ट्रॉनिक थ्रॉटल कंट्रोल सिस्टम आहे. जे म्यॅनूअल मोडमध्ये असेल. तसेच बाईकमध्ये आधीसारखे USD फ्रंट फोर्क्स असेल, ज्या गोल्ड शेड नसतील. दरम्यान या बाईकचे बाकी पार्ट कमी प्रीमियम राहिल. यात फॅन्सी स्प्लिट सीट सेटअपच्या ऐवजी सिंगल-पीस युनिट असेल. रियर टेल लाइट वेगळे असेल आणि ग्रॅब रेलही पाहायाला मिळाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार यामध्ये फ्यूल टँकवर रबर पॅड असेल आणि हँडलबार without ब्रेक पॅडवर एक सरल युनिट असेल.
(वाचा)- Mahindra XEV 9e: महिंद्राची कमाल! आपल्या नवीन इलेक्ट्रिक SUV ची स्वतःच केली क्रॅश टेस्ट; पाहा किती आहे सेफ?

 

Triumph Scrambler T4: पॉवर आणि इंजिन

यामध्ये 400cc चे इंजिन असेल. जे 30.6 bhp ची पीक पॉवर आणि 5,000 RPM वर 36 Nm पीक टॉर्क जनरेट करेल. तसेच या, इंजिनला 6-स्पीड गिअरबॉक्सशी जोडले जाऊ शकते.
(वाचा)- New Honda Amaze: नवीन होंडा अमेझ लाँच होण्यापूर्वी झाली स्पॉट; फ्रंट आणि रिअरमध्ये होणार मोठा बदल

Triumph Scrambler T4: किती असणार किंमत?

यामध्ये दिलेले हेडलाइट्स आणि फ्रंट मडगार्ड सारखे असतील. दरम्यान यामध्ये इन्स्ट्रुमेंट क्लस्टर हे सेमी-डिजिटल युनिट आहे. यामध्ये अलॉय व्हीलची डिझाइन वेगळी असेल. ही बाईक भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपो 2025 मध्ये लाँच केली जाऊ शकते. या बाईकची किंमत 2.4 लाख रुपये असू शकते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button