तुमचा फायदावेब स्टोरी

या स्वस्त स्क्रॅम्बलर बाईकवर मिळत आहे हजारो मोफत ॲक्सेसरीज; जाणून घ्या डिटेल्स

Triumph Scrambler 400X Free Accessories: ट्रायम्फ मोटरसायकल इंडिया या बाईकसह रु. 12,500 पर्यंत मोफत ॲक्सेसरीज देत आहे. यामध्ये लोअर इंजिन बार, हाय मडगार्ड किट, कोटेड

Triumph Motorcycles India ने गेल्या वर्षी भारतात नवीन Scrambler 400 आणि 400X बाईक लाँच केल्या. आता कंपनी या बाईकसोबत 12,500 रुपयांपर्यंतच्या ॲक्सेसरीज मोफत देत आहे. यामध्ये लोअर इंजिन बार, हाय मडगार्ड किट, कोटेड विंडस्क्रीन, लगेज रॅक किट आणि टँक पॉड यांचा समावेश आहे. याशिवाय ग्राहकांना ट्रायम्फ ब्रँडेड टी-शर्टही मिळेल. काही काळापूर्वी कंपनीने Scrambler 400X न्यू कलरमध्ये लाँच केली. तसेच या बाईकला ब्लॅक फिनिश देण्यात आली आहे.
(वाचा)- डिसेंबर महिन्यात मिळत आहे मारुती सुझुकी स्विफ्टवर डिस्काउंट; जाणून घ्या ऑफर्स डिटेल्स

Triumph India ने नवीन Scrambler 400X तसेच मागील ABS सह दोन्ही व्हिल्सवर डिस्क ब्रेक दिले आहेत. याशिवाय नवीन बाईकचे फीचर्स स्पीड 400 सारखेच आहेत. नवीन Scrambler 400 मात्र, पॉवर आणि फीचर्सच्या बाबतीत येझदीची ही बाईक ट्रायम्फपेक्षा खूपच स्ट्राँद आहे. ही बाईक KTM 390 Adventure शी स्पर्धा करते.

ट्रायम्फ मोटरसायकल इंडियाच्या या दोन्ही बाईक्समध्ये नवीन 398.15 सीसी सिंगल-सिलेंडर लिक्विड-कूल्ड इंजिन आहे. हे इंजिन 8,000 rpm वर 39.5 bhp पॉवर आणि 6,500 rpm वर 37.5 Nm पीक टॉर्क जनरेट करते. कंपनीने याला 6-स्पीड गिअरबॉक्सही दिले आहे. याशिवाय दोन्ही बाईक वेगवेगळ्या मॉडेल्सनुसार वेगवेगळ्या ट्युनिंगमध्ये लाँच करण्यात आल्या आहेत. दोन्ही बाइक्सच्या पुढील बाजूस 43 मिमी USD फोर्क्स आणि मागील बाजूस ॲडजस्टेबल गॅस चार्ज केलेले मोनोशॉक सस्पेंशन आहे.
(वाचा)- New Dzire Booking: महिन्याभराच्या आत नवीन डिझायरला मिळाले 30,000 हून अधिक बुकिंग; हा व्हेरिएंट आहे सर्वात जास्त पॉप्यूलर

ट्रायम्फने दोन्ही मोटारसायकलींना एलसीडी स्क्रीनसह नवीन स्पीडोमीटर दिले आहे. यात एलईडी लाइटिंग, ड्युअल-चॅनल एबीएस, राइड बाय वायर, इमोबिलायझर आणि शट-ऑफ ट्रॅक्शन कंट्रोल आहे. याशिवाय, कंपनीने ट्रायम्फ स्क्रॅम्बलर 400X सह स्विच करण्यायोग्य ABS देखील प्रदान केले आहे. दोन्ही बाईकला वेगवेगळी व्हिल्स देण्यात आली आहेत, ज्यामध्ये Street 400 ला 17-इंच व्हिल्स देण्यात आली आहेत, तर Scrambler 400X ला पुढील बाजूस 19-इंच आणि मागील बाजूस 17-इंच व्हिल्स देण्यात आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button