चालू घडामोडीटेक न्यूजतुमचा फायदालाईफस्टाईलवेब स्टोरीव्हायरल

RTMNU Exam Time Table: दीक्षांत समारंभासाठी विद्यापीठाने ३६ परीक्षा पुढे ढकलल्या, विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर

RTMNU Winter Exam postpones 2024 : या निर्णयाने विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. दुसरीकडे विद्यापीठामध्ये वर्षांतून एकदा दीक्षांत समारंभ घेणे आवश्‍यक आहे. गेल्या काही महिन्यांत विद्यापीठात घडलेल्या घडामोडी यामुळे विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ बराच लांबला आहे. दीक्षांत समारंभाशिवाय विद्यापीठाची पदवी अधिकृत होत नाही. त्यामुळे विद्यापीठाकडून डिसेंबर महिन्यात दीक्षांतचे आयोजन करण्यात आले आहे.

मंदार मोरोने, नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभासाठी विद्यापीठाने ३६ परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ १६ डिसेंबरला आयोजित करण्यात आला आहे. या परीक्षा आता २६ डिसेंबरला होणार असल्याची माहिती आहे.

सध्या विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांचा तिसरा टप्पा सुरू आहे. यात पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमातील सेमिस्टर परीक्षा सुरू आहे. मात्र, नियोजित कार्यक्रमानुसार विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ १६ डिसेंबरला होणार आहे. याच दिवशी सुमारे ३६ परीक्षा होणार होत्या. यात एमए, बीए, एमएस्सी, एमलिब, बीबीसीए, बीएस्सी, बीकॉम या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. या अभ्यासक्रमात हजारो विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. अशावेळी अचानक पेपर रद्द झाल्याने विद्यार्थ्यांना फटका बसला असल्याचे दिसून येते.

या निर्णयाने विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. दुसरीकडे विद्यापीठामध्ये वर्षांतून एकदा दीक्षांत समारंभ घेणे आवश्‍यक आहे. गेल्या काही महिन्यांत विद्यापीठात घडलेल्या घडामोडी यामुळे विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ बराच लांबला आहे. दीक्षांत समारंभाशिवाय विद्यापीठाची पदवी अधिकृत होत नाही. त्यामुळे विद्यापीठाकडून डिसेंबर महिन्यात दीक्षांतचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, त्यामुळे परीक्षांच्या तारखामध्ये बदल करण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button